उदगीर येथे राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री बालमुकुंद राठी विद्यालयाच्या संघाला रौप्यपदक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

उदगीर येथे राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री बालमुकुंद राठी विद्यालयाच्या संघाला रौप्यपदक


 शिरजगाव कसबा : दिनाक २६

(ग्रामीणमध्ये न्यूज नेटवर्क)

     उदगीर (जि.लातूर) येथे नुकताच राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा  पार पडली आहे .त्यावेळी चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील श्री .बालमुकुंद राठी विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने राज्यपदक/ रौप्यपदक पटकावले आहे .

   या प्रतिष्ठित राज्यस्तरीय  स्पर्धेदरम्यान संघाने शिस्तबद्ध खेळ, संघभावना व उच्च कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या कीडा क्षेत्रातील कामगिरीला राज्यस्तरावर मान्यता मिळाली आहे. 

गौरवोद्गार:

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय राठी, उपाध्यक्ष श्यामसुंदर राठी, सचिव प्रशांत राठी यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे कौतुक केले. 

मार्गदर्शक आणि यशस्वीता:

तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश सुरडकर, ज्ञानेश्वर नवलकर, प्रशिक्षक दंडाळे तसेच सर्वेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूनी हे यश मिळविले आहे. 

मागील वर्षी या विद्यालयाची आदर्श विद्यालय म्हणून निवड झाली आहे हे विशेष. 

या यशामुळे त्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages