दिव्यांग लाभार्थ्यांना ह्यातीचे प्रमाणपत्र काढण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

दिव्यांग लाभार्थ्यांना ह्यातीचे प्रमाणपत्र काढण्याचे आवाहन



अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव अनुदान प्राप्त झाले नसल्यास ह्यातीचे प्रमाणपत्र काढून पोर्टलवर अपडेट करावे लागणार आहे. त्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी ह्यातीचे प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1 हजार रूपयांची वाढ करून 2 हजार 500 रूपये इतके अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापही वाढीव अनुदान प्राप्त झाले नाही, त्यांनी आपले यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि आधार लिंक असलेल्या बॅंक पासबुकची प्रत तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत सादर करावी.

शासनाकडून केंद्र, पुरस्कृत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, वीर पत्नी व दिव्यांग योजनांच्या लाभार्थ्यांना दरवर्षी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. योजनेतील लाभार्थ्यांना ह्यातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाकडून आधार आधारीत जीवन प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली आहे. ह्यातीच्या प्रमाणपत्राअभावी शासनाकडून लाभार्थ्यांचा लाभ मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना ॲपद्वारे डिजीटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच ऑनलाईन ह्यातीचे प्रमाणपत्र जनरेट करावयाचे आहे. सदर प्रमाणपत्र एनएसएपी पोर्टलवर अपडेट होणार आहे.

तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात येथे ऑनलाईन ह्यातीचे प्रमाणपत्र जनरेट करण्यात येत आहे. याशिवाय ॲडरॉईड मोबाईमध्ये ॲपद्वारे नि:शुल्क डीएलसी जनरेट करू शकता येणार आहे. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन ह्यातीचे प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages