ग्रंथभेट योजनेसाठी प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

ग्रंथभेट योजनेसाठी प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन




अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत 52 व्या ग्रंथभेट योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी सन - 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या वतीने समान निधी 'ग्रंथभेट' योजनेंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात.

या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करणे, तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिद्ध होणाऱ्या 'शासनमान्य ग्रंथ निवडयादी' मध्ये समावेश होण्यासाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दि. 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत सादर करावी लागणार आहे. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 नुसार मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधीत ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठविताना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथांसोबत टपालामार्फत किंवा समक्ष पाठविण्यात यावी. तसेच सर्व लेखक, प्रकाशक यांनी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages