पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या 'सॅक्रिड पिप्रावा रिलिक्स' प्रदर्शनाचे उद्घाटन; बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे होणार दर्शन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 1, 2026

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या 'सॅक्रिड पिप्रावा रिलिक्स' प्रदर्शनाचे उद्घाटन; बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे होणार दर्शन



 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांशी संबंधित 'सॅक्रिड पिप्रावा रिलिक्स'  या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील 

दि.२ :- नवी दिल्ली:

भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जगासमोर मांडण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एका ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
"लोटस लाइट: रेलिक्स ऑफ द अवेकेंड वन"  या शीर्षकाखाली हे प्रदर्शन भरवण्यात येत असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे.
ऐतिहासिक महत्त्व: १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पिप्रावा स्तूपातून हे अवशेष उत्खननाद्वारे मिळाले होते. हे अवशेष भगवान बुद्धांच्या अस्थींशी संबंधित असून शाक्य वंशाने त्यांचे जतन केले होते, असे मानले जाते 
मायदेशी परतलेले अवशेष: एका शतकाहून अधिक काळानंतर भारतात परत आणलेले (Repatriated) अवशेष आणि राष्ट्रीय संग्रहालय (नवी दिल्ली) व भारतीय संग्रहालय (कोलकाता) मधील पुरातत्वीय साहित्य प्रथमच या प्रदर्शनात एकत्र पाहायला मिळणार आहे 
प्रदर्शनाचे आकर्षण: प्रदर्शनात सांची स्तूपापासून प्रेरित एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. तसेच भगवान बुद्धांचे जीवन, पिप्रावाचा शोध आणि बौद्ध कलेचा प्रसार दर्शवणारे विविध विभाग यात आहेत 
तंत्रज्ञानाचा वापर: लोकांच्या माहितीसाठी या प्रदर्शनात इमर्सिव्ह ऑडिओ-व्हिज्युअल फिल्म्स, डिजिटल रिकन्स्ट्रक्शन आणि मल्टीमीडिया प्रेझेंटेशनचा वापर करण्यात आला आहे 
हे प्रदर्शन भारताचे बौद्ध धर्माशी असलेले अतूट नाते आणि जागतिक स्तरावर शांतता व करुणेचा संदेश देण्याचे प्रतीक मानले जात आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages