राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२५-२६ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, January 5, 2026

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२५-२६ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ




            अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2025-26 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ताज्या घडामोडी या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages