महाटीईटी परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, January 14, 2026

महाटीईटी परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहीर

 


अमरावती दि. १४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूची बाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रं. एक व दोनच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रूटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 27 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि. 19 डिसेंबर 2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूची बाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

            या अंतिम उत्तरसूचीनूसार MAHATET-2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परीषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असेही आवाहन आयुक्त श्रीमती ओक यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages