योजनांच्या लाभार्थ्यांनी आधार लिंक करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

योजनांच्या लाभार्थ्यांनी आधार लिंक करण्याचे आवाहन


अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शासनातर्फे विविध लाभाच्या योजना राबविण्यात येते. यासाठी आधार लिंक आणि सिडींग करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकास्तरावर प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वीर पत्नी व इंदिरा गांधी राष्ट्रीय वीर पत्नी योजना लाभार्थ्यांनी योजनेतील लाभ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि संपर्क क्रमांक सादर करावे लागणार आहे. तसेच आधार लिंकिंग आणि सिंडींग करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे सादर करण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार संबंधित महानगर पालिका झोन कार्यालयात संगणक चालक अमोल कडुकार, संपर्क क्रमांक 8806326701 यांच्याशी संपर्क साधावा. महानगर पालिका प्रभागानुसार सकाळी 11 ते 5 या वेळात रामपुरी कॅम्प प्रभाग 1 येथे दि. 27 व 28 जानेवारी, राजापेठ प्रभाग 2 येथे दि. 29 व 30 जानेवारी, दस्तुरनगर प्रभाग 3 येथे दि. 2 व 3 फेब्रुवारी, बडनेरा प्रभाग 4 येथे दि. 4 व 5 फेब्रुवारी, भाजी बाजार प्रभाग 5 येथे दि. 6 व 9 फेब्रुवारी 2026 राहील.

कागदपत्रे व आधार लिंकिंग, सिंडींग प्रक्रिया वेळेत पुर्ण झाली नसल्यास लाभ मिळण्यास अडचण झाल्यास तयाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यावर राहणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन संगायो अमरावती शहरच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages