राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान” - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, January 20, 2026

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

 


अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अमरावती डाक विभागातर्फे ‘नन्ही मुस्कान, बडी उडान’ विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेत 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी खाते’ उघडण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनजागृती करीत आहेत. मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी खाते हा एक महत्त्वाचा उपक्रम असून पालकांनी मुलीचे खाते उघडून त्यांच्या भविष्यासाठी भरीव पाऊल उचलावे, असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मुलींचे शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ध्येयाला बल देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यावा, मुलींच्या स्वप्नांना पंख द्यावेत, असे आवाहन डाकघरचे प्रवर अधीक्षक पी. ए. गेडाम यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages