वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 26, 2025

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

 



अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल  गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.                      

शिखांचे दहावे व अखेरचे गुरू असलेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ 26 डिसेंबर हा दिवस सन 2022 पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाल वयातच या बालकांनी शिख संप्रदायाचा सन्मान व अस्मिता राखून आपले बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ व त्यांनी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस देशभर वीर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages