ग्रेड पीएसआय सुदर्शन झोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 9, 2025

ग्रेड पीएसआय सुदर्शन झोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन



परतवाडा, १० डिसेंबर (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये पोलीस विभागात कार्यरत असलेले ग्रेड पीएसआय सुदर्शन झोड यांचे   पहाटे दिनांक ८-१२-२०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
  सुदर्शन झोड, बक्कल नंबर ८२६, हे अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये नियुक्त होते आणि सध्या उपविभागीय पोलीस कार्यालय अचलपूर येथे संलग्न होते. ते अचलपूरच्या गोपनीय विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत होते.
त्यांचे प्रत्येक समाजातील घटकांवर विशेष लक्ष होते. कोणत्याही घटनांचा प्राथमिक अंदाज आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत गोपनीय माहिती खात्रीशीरपणे देण्याचे काम ते बघत असत. समाजातील गोरगरीब, सुशिक्षित आणि सर्वधर्मसमभाव या आधारावर काम करत त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका निभावली.
अंतिम संस्कार: दिनांक ८-१२-२०२५ रोजी सकाळी त्यांना राहते घरी तीव्र झटका आल्याने निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाची माहिती कळताच अचलपूर-परतवाडा वासियांनी शोक व्यक्त केला. काल त्यांच्या पार्थिवावर परतवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
परिवार: त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा डॉक्टर, पत्नी, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages