महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या संबंधित पाच सेवा अधिसूचित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, December 20, 2025

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या संबंधित पाच सेवा अधिसूचित



https://sevaarth.mahakosh.gov.in संकेतस्थळ उपलब्ध

 

          अमरावती दि. २० : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ मधील तरतुदीनुसार वित्त विभागाने दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी एकूण पाच सेवा अधिसूचित केल्या आहेत. यानुषंगाने पात्र निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी त्यांना आवश्यक असलेल्या अधिसूचित सेवा, संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून निर्धारित कालावधीत प्राप्त करून घ्याव्यात. सेवा प्रदान करण्यात विलंब झाल्यास किंवा विहित कारणे नमूद न करता सेवा नाकारण्यात आल्यास संबंधित व्यक्तीस प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल करण्याची तरतूद आहे, अधिनियमान्वये करण्यात आली आहे. अशी माहिती राज्यसेवाहक्क आयुक्त कार्याल्याचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

         

          या अधिसूचनेमध्ये सेवा प्रदान करणारे पदनिर्देशित अधिकारी, तसेच प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा सविस्तर तपशील नमूद करण्यात आला आहे. ही अधिसूचना शासनाच्या अधिकृत सेवार्थ संकेतस्थळावर https://sevaarth.mahakosh.gov.in उपलब्ध करुण देण्यात आली आहे. तदनंतरही अधिसूचित सेवा प्राप्त न झाल्यास पात्र व्यक्ती राज्य सेवा हक्क आयुक्त, अमरावती विभाग यांच्याकडे तृतीय अपिल दाखल करू शकते. या निर्णयामुळे निवृत्तीवेतनधारकांच्या सेवासुविधांना अधिक पारदर्शकता व वेळबद्धता मिळणार असल्याचे उपसचिव श्री. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages