विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिभेला व्यासपीठ राज्यस्तरीय सायन्स कॉन्फरन्स स्पर्धेचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 2, 2025

विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिभेला व्यासपीठ राज्यस्तरीय सायन्स कॉन्फरन्स स्पर्धेचे आयोजन


दि.३ यवतमाळ:   यवतमाळ येथे प्रथमच राज्यस्तरीय स्टुडंट लेड सायन्स कॉन्फरन्स या नाविन्यपूर्ण विज्ञानपर स्पर्धेचे आयोजन लीड स्कूल द्वारा यवतमाळ येथील जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. इयत्ता 1ली ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये गट अ मध्ये वर्ग पहिली व दुसरी, गट ब मध्ये वर्ग तिसरी ते पाचवी, गट क मध्ये सहावी ते आठवी, गट ड मध्ये वर्ग नववी व दहावी असे विभागून ही परिषद आयोजित केली असून विद्यार्थ्यांना कोणत्याही विज्ञानविषयक विषयावर मॉडेल, चार्ट, प्रयोग, मल्टिमीडिया किंवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आपले सादरीकरण करण्याची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरण कौशल्य, आत्मविश्वास, भाषा, वैज्ञानिक माहिती आणि सादरीकरणातील कल्पकता या निकषांवर मूल्यांकन केले जाणार आहे. आकर्षक पारितोषिकांसह पहिला पारितोषिक टॅबलेट, दुसरा पारितोषिक स्मार्ट वॉच, तिसरं पारितोषिक २० ग्रॅम सिल्व्हर कॉईन अशी प्रत्येक गटात बक्षिसे तसेच सर्व सहभागींसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रथम फेरी ऑनलाइन असून विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ व १५० शब्दांचा संक्षेप ३ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवायचा आहे. तर अंतिम फेरी १० जानेवारी २०२६ रोजी जाजू इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ येथे प्रत्यक्ष पद्धतीने घेण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५अशी जाहीर करण्यात आली आहे. विज्ञानाची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिषद सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. www.jis.hjes.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी अथवा अधिक माहितीसाठी 9011139226 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी अनेक विज्ञान प्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages