काल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 18, 2025

काल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.



आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा प्रशासन अमरावती यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर क्र. 3' चे आयोजन करण्यात आले होते . शिबिर काल शुक्रवार, दि. 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात पार पडले.

मार्गदर्शन शिबिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 20 वा क्रमांक पटकावणारे आयएएस अधिकारी आकाश वर्मा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 8 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

सदर शिबीर सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य होते. या शिबिरात यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन आणि यशाची सूत्रे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages