अंजनगाव सुर्जीत दत्त जयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 27, 2025

अंजनगाव सुर्जीत दत्त जयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात



  झोळी मिरवणुकीने वातावरण भक्तिमय

दि.२८ अंजनगाव सुर्जी:
अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध आनंदमठ दत्तघाट परिसरात आज, शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ पासून भगवान श्री दत्त जयंती उत्सवाचा नवरात्रारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरू झाला आहे. पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सुरुवात आज सकाळी मंगलमय वातावरणात झाली.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी आनंदमठ दत्तघाट येथून पारंपरिक झोळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर दत्त नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. महिला भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला, तर अनेक दिंड्या आणि भजनी मंडळांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.
या नऊ दिवसांच्या काळात मठात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, प्रवचने आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होण्यासाठी हजेरी लावत आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages