बोगस जन्म दाखले मोहीम: अंजनगाव सुर्जी 'हॉटस्पॉट', महसूलमंत्र्यांचे तात्काळ रद्दचे आदेश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 27, 2025

बोगस जन्म दाखले मोहीम: अंजनगाव सुर्जी 'हॉटस्पॉट', महसूलमंत्र्यांचे तात्काळ रद्दचे आदेश


दि.२८ अंजनगाव सुर्जी :

राज्यात केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर किंवा संशयास्पदरीत्या मिळवलेले जन्म आणि मृत्यूचे दाखले तात्काळ प्रभावाने रद्द करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (२८ नोव्हेंबर २०२५) यासंदर्भात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

ऑगस्ट २०२३ मधील अधिनियमातील दुरुस्तीनुसार, जन्म दाखला मिळवण्यासाठी केवळ आधार कार्ड पुरेसा पुरावा मानला जात नाही. या नियमाचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी बनावट किंवा बोगस दाखले काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. 
अंजनगाव सुर्जीवर विशेष लक्ष:
या मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी परिसरावर महसूल विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. मोठ्या प्रमाणात बोगस दाखले मिळवल्याच्या तक्रारींमुळे अंजनगाव सुर्जीची ओळख 'हॉटस्पॉट' म्हणून करण्यात आली आहे.
बावनकुळे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, संशयास्पद वाटणारे आणि केवळ आधारवर दिलेले दाखले त्वरित शोधून काढावेत आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी. या कारवाईमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या दाखलेधारकांचे धाबे दणाणले आहेत

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages