सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तिवसा येथे 'युनिटी पदयात्रा' संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 18, 2025

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तिवसा येथे 'युनिटी पदयात्रा' संपन्न

                                       


अमरावती, दि. 19 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून 'मेरा युवा भारत' (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत देशभर 'सरदार@150 अभियान' अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान चालणाऱ्या या अभियानाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यात या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा येथे आज 'युनिटी पदयात्रा' (सरदार@150 पदयात्रा) आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, नायब तहसिलदार आशिष नागरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख, मेरा युवा भारतच्या स्नेहल बासुतकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. ही पदयात्रा या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पेट्रोल पंप, शहीद स्मारक मार्गे पुन्हा महाविद्यालयात येवून पदयात्रेचा  समारोप करण्यात आला. या 'सरदार@150 पदयात्रे'त मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, विविध शाळा-महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages