कुष्ठरुग्ण शोध अभियान: जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 18, 2025

कुष्ठरुग्ण शोध अभियान: जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

                                        





अमरावती, दि. 19 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर  तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती.

सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी यावेळी जिल्ह्याच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सद्यस्थिती आणि अभियानाचे नियोजन सादर केले. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी कुष्ठरुग्णांचा लवकर शोध घेण्यासाठी सर्व उपस्थित अधिकारी आणि जनतेने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 समाजात कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.  व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी जेणेकरून कुष्ठरोग संसर्गाची साखळी समाजातून खंडित होईल.  सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे ध्येय जिल्हास्तरावर साध्य करता येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages