पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 24, 2025

पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला

 


लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू, तणाव वाढला

इस्लामाबाद/काबुल, [दि.२५]:
पाकिस्तानच्या लष्करी दलांनी आज पहाटे अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागातील लक्ष्यांवर हवाई हल्ले केले. या अचानक केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत आणि सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीऊल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) रोजी सांगितले की, अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात असलेल्या एका घरावरच पाकिस्तानी लष्कराकडून बॉम्ब टाकण्यात आले. यात ९ मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने कुनार आणि पक्तिका प्रांतातही हल्ले केले आहेत. त्यात चार लोक जखमी झाले आहेत. रॉयटर्स वृत्त संस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानने या हल्ल्यांचे उद्दिष्ट सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवणे असल्याचे म्हटले आहे. मात्र, या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला असून, युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता वाढली आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि या कृत्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सज्जता वाढवण्यात आली असून, भविष्यात परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages