आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत

आरोग्य सेविकांचा पुढाकार

अमरावती, दि.१५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभूरसोंडा येथे राबविण्यात येत असलेल्या माहेरघर योजना तसेच जे.एस.एस.के. (जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम) योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात मातांना आहार पुरविण्यात येतो.

टेंभूरसोंडा येथील मूळ माहेरघर नादुरुस्त असल्यामुळे, पर्यायी व्यवस्था म्हणून प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वॉर्डातच भरती केले जात आहे. भरती झालेल्या मातांना श्री विशाल गावंडे, वैदेही भोजनालय, टेंभूरसोंडा यांच्यामार्फत दोन वेळचे जेवण पुरवले जात होते. परंतु, संबंधित पुरवठाधारक यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे माहे ऑक्टोबरपासून जेवणाचा पुरवठा होऊ शकला नाही. या कारणामुळे श्री वायकर भोजनालय, टेंभूरसोंडा यांच्याकडे तात्पुरती व्यवस्था सोपवण्यात आली होती, परंतु त्यांच्याकडूनही भरती झालेल्या मातांना जेवणाचा पुरवठा करण्यात आला नाही.

जेवण पुरवठा खंडित झाला असताना, आरोग्य सेविका यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. आरोग्य विभागाने आता जेवण पुरवठा नियमित चालू केला आहे.तसेच, भविष्यात जेवणात खंड पडू नये म्हणून पुरवठा आदेश धारकांना ताकीदही देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत असल्याचे स्पष्ट केले असून, केवळ पुरवठाधारकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे तात्पुरता खंड पडला होता, असे नमूद केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages