जिल्ह्यासाठी आधारभूत' खरेदी केंद्रांना मंजुरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 24, 2025

जिल्ह्यासाठी आधारभूत' खरेदी केंद्रांना मंजुरी




*शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत ज्वारी, बाजरी, मका, रागी भरडधान्य खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत आठ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, धारणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल तालुक्यांतील अनुसूचित जनजाती क्षेत्रासाठी विशेषतः 8 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत ही केंद्रे चालवली जातील. यामध्ये धारणी तालुक्यात  बैरागड, सावलीखेडा, साद्रावाडी, चाकर्दा, धारणी, हरिसाल, धारणी तसेच चिखलदरा तालुक्यात चुरणी आणि गौलखेडा बाजार येथील केंद्रांचा समावेश आहे.

हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी कालावधी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील. तसेच खरेदी कालावधी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील. त्यानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवून राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. खरेदी केंद्रावर धान्य आणण्यापूर्वी व्यवस्थितरित्या वाळवून, स्वच्छ करून आणावे. याबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय, धारणी व चिखलदरा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालय धारणीचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष आमटे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages