व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, October 8, 2025

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम


अमरावती, दि. 0८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कौशल्य विकास विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.

राज्यातील 400 पेक्षा अधिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये चालविण्यात येणाऱ्या नवयुगीन व पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पायाभूत सुविधांचा अधिकाधिक उपयोग करीत तेथे चालणाऱ्या नियमित वर्गाच्या आधी किंवा नंतर उपलब्ध होणाऱ्या वेळेत हे अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सदर अल्पमुदती अभ्यासक्रम प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 7 शासकीय तंत्र माध्यमिक शाळांमध्ये 128 अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांपैकी 93 अल्पमुदतीचे प्रशिक्षण दि. 8 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहेत. अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी शिकणारे, उत्तीर्ण झालेले युवक, युवती व महिलांनी नाममात्र 100 रूपये भरून नाव नोंदणी करावी लागणार आहे.

अल्पमुदतीचे गारश्रम प्रशिक्षण योजनेत महिलांसाठी स्वतंत्र नवयुगीन अल्पमुदतीचे प्रशिक्षण सुध्दा उपलब्ध आहे. अधिक माहिती रोज msbsvet.edu.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अत्यल्प शुल्कामध्ये प्रशिक्षण मिळत असल्यामुळे प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुळे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages