समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत जाहिर सूचना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, October 8, 2025

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत जाहिर सूचना

   ·     सविस्तर जाहिरात www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध
·    10 नोव्हेंबर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची अंतीम मूदत

 

अमरावती, दि. 0८ : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. 1 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यातील विविध केंद्रावर आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द आली आहे. तरी परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबतचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदाची वेतनश्रेणी एस-15 (41800-132300) असून एकूण पदसंख्या 2,410 आहे. तसेच सदर पदे ही मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व लातूर विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील आहे. या सर्व पदांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तिंसाठी पदे राखीव असून रायगड, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, रत्नागिरी, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे व लातूर या जिल्ह्यांत उर्दु माध्यमाची पदे उपलब्ध आहेत.

या स्पर्धा परीक्षेकरिता फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. जाहिरातीस अनुसरुन निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए./ बी.कॉम./बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्र राहील.

लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 18 जुलै 2025 शासन अधिसूचना व 29 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे. इच्छुक उमेदवारांनी https://www.mscepune.in या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनअर्ज सादर करावे. पूर्वी सन 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी दि. 8 ते 18 ऑक्टोबर आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी राहील. नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज दि. 25 ऑक्टोबर ते दि. 10 नोव्हेंबर या कालावधीत सादर करता येईल. दि. 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतीम तारीख आहे. दि. 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा होणार आहे, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages