महादेवा फुटबॉल योजना: लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची संधी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 24, 2025

महादेवा फुटबॉल योजना: लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची संधी



 अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशन, सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने महादेवा ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेचा भाग म्हणून राज्यातील 13 वर्षांखालील मुले, मुलींसाठी (जन्मतारीख दि. 01.01.2012 ते 31.12.2013) जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवडचाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. तरी सदर निवड चाचणीस्थळी येण्यापूर्वी यासोबत जोडलेल्या गुगल

 लिंकद्वारे (https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7) नोंदणी करावी. आपल्या शाळा, संस्थेतील जास्तीत जास्त फुटबॉल खेळाडूंना सहभागी होण्यास प्रोत्साहित करून फुटबॉल या खेळात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंतिम निवड झालेल्या खेळाडूंना राज्यशासनातर्फे प्रोत्साहन म्हणून 5 वर्ष स्कॉलरशिप, निवासी प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हास्तर निवड चाचणी स्थळ हे पोलिस ग्राउंड, पोलिस पेट्रोल पंप मागे, अमरावती आहे.  चाचणी दिनांक दि. 29 ऑक्टोबर 2025, सकाळी 9.30 वाजता राहील. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड व जन्माचा दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी अमरावती जिल्हा फुटबॉल संघटना सचिव सुशिल सुर्वे (मो. 7875652527) यावर संपर्क साधावा,. जास्तीत -जास्त खेळाडूंनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages