अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी 'फॉर्म 19' - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 24, 2025

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी 'फॉर्म 19'


सादर करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत

अमरवती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्र असलेल्या पात्र मतदारांनी (फॉर्म 19) मधील अर्ज वेळेत सादर करावा. मतदार नोंदणी नियम, 1960 नुसार, मतदार नोंदणी अधिकारी यांनी आवाहन केले आहे की, ज्या व्यक्तींची नावे यापूर्वी मतदार यादीत समाविष्ट नाहीत, त्यांनी हा अर्ज दिनांक 06 नोव्हेंबर, 2025 (गुरुवार) पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. हा नमुना 19 अर्ज मतदार नोंदणी नियम, 1960 मधील दुसऱ्या अनुसूचीमध्ये उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी व तपशीलासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे www.ceo.maharashtra.gov.in तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचे संकेतस्थळ www.amravatidivision.gov.in यावर संपर्क साधावा.  सर्व पात्र शिक्षकांनी या अंतिम मुदतीची नोंद घेऊन आपली मतदार नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages