तलावावर संस्था नोंदणी करण्याबाबत आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

तलावावर संस्था नोंदणी करण्याबाबत आवाहन

स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, महिला यांना संधी

अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील 500 हेक्टरखालील पाटबंधारे जलसंधारण विभागाचे धानोरा दिग्रस तलाव (44 हे) हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या तलावावर शासन निर्णयानुसार संस्था नोंदणी करावयाची आहे. यासाठी तलाव परीसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांना संधी मिळणार आहे. तरी धानोरा दिग्रस तलाव (44 हे) या तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहाय्यक निबंधक, (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधून बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणी करीता प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages