थेट कर्ज योजनेतील लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

थेट कर्ज योजनेतील लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड


अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट लाभाची योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे. ही सोडत मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे.

यात 125 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये 63 पुरुष व 62 महिला लाभार्थी राहणार आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत एकूण 175 कर्ज मागणी अर्जापैकी 173 अर्ज पात्र झाले आहेत. त्यामध्ये 119 पुरूष व 54 महिला आहेत. यातील 63 पुरूष आणि 62 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

ही सोडत दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, कॅम्प, अमरावती काढण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. टी. खडसे यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages