महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ शिक्षण मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा जाहीर. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 7, 2025

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ शिक्षण मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा जाहीर.

            अमरावती, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत विद्यार्थी सदर पाच सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अधिसूचित सेवांच्या नावाचा व सेवांना लागणारा कालावधी तसेच त्यासंबंधित पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व व्दितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्रे मिळविणे या अधिसूचित सेवेसाठी तात्काळसाठी तीन दिवस तर नियमितपणे मिळविण्यासाठी चा कालावधी सात दिवसांचा असेल माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचे तात्पुरते (provisional) प्रमाणपत्र सादर केल्यापासून आठ दिवसांचा राहील तर निकालानंतर गुण पडताळणी अर्ज सादर करण्याच्या पंधरा दिवसात प्राप्त केल्या जाईल.

            उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत ही निकालानंतर अर्ज सादर करण्यापासून ३० दिवस किंवा तत्पूर्वी प्राप्त होईल खाजगीरीत्या उमेदवार मंडळाच्या परीक्षेत मंडळाच्या वार्षिक वेळापत्रकानुसार प्रविष्ट होऊ शकणार

            उपरोक्त सर्व अधिसूचित सेवांशी संबंधित विभागीय मंडळाचे विभागीय सचिव हे पद निर्देशित अधिकारी असेल. तसेच संबंधित मंडळाचे विभागीय अध्यक्ष हे प्रथम अपीलय अधिकारी असणार तर द्वितीय अपीलय अधिकारी राज्य मंडळाचे अध्यक्ष असतील.

            विद्यार्थ्यांनी अधिक माहितीकरिता राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन महामंडळाच्या देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा. याची सर्व विद्यार्थी, पालक, नागरिकांनी नोंद घ्यावी, असे राज्यमंडळ पुणेचे सहसचिव प्रमोद गोफने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages