शिरजगाव कसबा दिनांक ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शिरसगाव कसबा येथील कु. जान्हवी संजय पोटे या आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने जवाहर नवोदय विद्यालय नलबारी आसाम राज्य येथे आयोजित राष्ट्रीय रोप स्कींपिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे या यशामुळे तिने जिल्ह्याचे तसेच शिरसगाव कसबा गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवले आहे तसेच जान्हवी पोटे हिने प्रादेशिक स्तरावर फ्रीस्टाईल खेळात तृतीय क्रमांक पटकावला असून राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल जान्हवीचे सर्वत्र कौतुक अभिनंदन केले जात आहे या यशाकरिता तिचे प्रशिक्षक संजय हिसवंकर, रूपाली राजुरकर यांनी अथक परिश्रम घेतले शिरसगाव कसबा येथील जय शिवाजी गणेश मंडळ तर्फे जानवी पोटे च्या आई वडिलांचा मुलीच्या राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण कामगिरी यश बद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार समारंभ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित केला होता.