अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई, - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई,

४ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : नांदगाव पेठ येथे अवैधरीत्या गॅस सिलिंडर रिफीलिंग आणि साठवणूक करणाऱ्या एका दुकानावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अमरावती ग्रामीण निरीक्षण अधिकारी यांनी दिली आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ५८ गॅस सिलिंडर ताब्यात घेण्यात आले आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाला नांदगाव पेठ येथे अवैधरीत्या गॅस सिलिंडर रिफीलिंग व मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता, संबंधित दुकानात गॅस रिफीलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे ३ संच, २ इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि एकूण ५८ गॅस सिलिंडर आढळून आले. यात ३० रिकामे घरगुती सिलिंडर, २३ भरलेले घरगुती सिलिंडर, १ व्यावसायिक सिलिंडर आणि ५ लहान भरलेले सिलिंडर यांचा समावेश होता.

एकूण २३ भरलेल्या सिलिंडरचे वजन ६९५ किलो असून, ते अवैध पद्धतीने रिफील केल्याचे आढळून आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल, ज्यामध्ये ५८ गॅस सिलिंडर, रिफीलिंग साहित्य आणि वजनकाटे यांचा समावेश आहे, अंदाजे ४ लाख रुपये किमतीचा आहे.

या प्रकरणात क्षमतेपेक्षा जास्त गॅस सिलिंडरची साठवणूक करून अवैध रिफीलिंग करत असल्याचे उघड झाले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून गॅस सिलेंडर रिफिलिंग करताना जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेचा पंचनामा आणि जप्तीनामा करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages