महाडीबीटी शिष्यवृत्ती: प्रलंबित अर्जांना मुदतवाढ; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

महाडीबीटी शिष्यवृत्ती: प्रलंबित अर्जांना मुदतवाढ;


महाविद्यालयांना ३० सप्टेंबरपर्यंतची अंतिम संधी

 

अमरावती,दि.२०(ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी समाज कल्याण विभागाने मुदतवाढ जाहीर केली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ या कालावधीतील विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयांचे अर्ज २२ सप्टेंबर, २०२५ पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ मधील प्रलंबित अर्ज ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत निकाली काढावे लागणार आहेत. ही अंतिम मुदत असून, त्यानंतर केंद्र हिस्सा ६० टक्के वितरणासाठी डेटा स्वीकारला जाणार नाही. यामुळे पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू शकतात.

समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी महाविद्यालयांना आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रलंबित अर्ज दिलेल्या मुदतीत निकाली काढावेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages