शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 27, 2025

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 27 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागास वर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी  https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, तो पोर्टलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अमरावती जिल्ह्यातील वसतिगृहे अमरावती स्थानिक वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विभागीयस्तरावरील मागासवर्गीय 1 हजार मुलांसाठी शासकीय वसतिगृह संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा तसेच मुलींसाठी 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे नवीन विलास नगर, अमरावती तसेच तालुका स्तरावरील मुला, मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाईन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम, अर्ज स्विकृतीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025, तर प्रवेशाची यादी प्रसिध्द करावयाची तारीख 4 ऑक्टोबर 2025 राहील. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 हा आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages