शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 27, 2025

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. हा आदेश दि. २९ सप्टेंबर ते दि. १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages