परशुराम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय तंत्रज्ञान स्पर्धेत चमकले - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 22, 2025

परशुराम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय तंत्रज्ञान स्पर्धेत चमकले


शिरजगाव  कसबा  दिनांक २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

परशुराम पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी, क्षितिज केदार आणि गौरी संभे, यांनी नुकतेच कूलस्ट प्रोजेक्ट २०२५ या राष्ट्रीय तंत्रज्ञान स्पर्धेत भाग घेऊन विजयी ठरले आहे.ही स्पर्धा रास्पबेरी पाई फाउंडेशनने आयोजित केली होती आणि ती हैदराबाद येथे पार पडली आहे.या स्पर्धेत देशभरातील तरुण निर्मितीकारांनी तयार केलेले अभिनव प्रकल्प सादर करण्यात आले.

  क्षितिज सुमित केदारचा प्रकल्प स्मार्ट इरिगेशन सिस्टम (Smart Irrigation System) असून, तो शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी रास्पबेरी पाई तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. तर दुसरीकडे, गौरी राजाभाऊ  संभे ने गेम डेव्हलपमेंटमध्ये (Game Development) आपले कौशल्य दाखवून परीक्षकांना प्रभावित केले. तिनेही यासाठी रास्पबेरी पाईचा वापर केला. गौरी राजाभाऊ संभे हीने गेम्स या कॅटेगिरी मधे  दुसरा क्रमांक मिळवून  परीक्षकांची आवडती ठरली आहे.

दोन्ही विद्यार्थ्यांनी परशुराम पब्लिक स्कूलच्या अत्याधुनिक STEAM Lab मध्ये आपले कौशल्य विकसित केले आहे.मॅजिक पाठशाला (Magic Pathshala) आणि जस्ट फॉर ह्युमॅनिटी फाउंडेशन (Just for Humanity Foundation) यांच्या मदतीने हे STEAM Lab तयार करण्यात आले आहे. हे Lab विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित या विषयांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आहे.

त्यांचा सहभाग आणि प्रभावी प्रकल्प हे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याच्या शाळेच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकत आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कविता बदुकले,व्यवस्थापक पंकज बेहेरे व सर्व शिक्षकांना दिले आहे

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages