आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करावे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 24, 2025

आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करावे



*गाभा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

 

अमरावती, दि. 25 : मेळघाटातील आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केली.

 

गाभा समितीची बैठक काल दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी चिखलदरा येथील तालुका प्रशिक्षण केंद्रात पार पडली. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आदी उपस्थित होते.

 

बैठकीत माता मृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यावर भर देण्यात आला. अति जोखमीच्या गरोदर मातांची वेळेवर ओळख करून त्यांना आरोग्य सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या संकल्पनेतून मेळघाट आरोग्य परिक्रमा' उपक्रम राबवण्यात येत आहे. यात मेळघाटात दरमहा चार आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहे. यात गरोदर आणि स्तनदा माता तसेच बालकांची स्त्रीरोग आणि बालरोग तज्ञांकडून तपासणी केली जात आहे. वर्षभ एकूण ५६ शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. बैठकीत अंगणवाडी, शाळा, बांधकाम, शिक्षण, शुद्ध पाणीपुरवठा, घरकुल योजना आणि टीबीमुक्त भारत यावरही चर्चा झाली.

 

सॅम आणि मॅम बालकांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यावर आणि त्यांचा पाठपुरावा करण्यावर लक्ष देण्यास सांगण्यात आले. अंगणवाडीमधील आणि स्थलांतरित लाभार्थ्यांचा पाठपुरावा करण्याचे निर्देश एकात्मिक बाल विकास विभागाला देण्यात आले, जेणेकरून कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही. विद्युत समस्येबाबत वीज मंडळाला योग्य सेवा देण्याबद्दल सांगण्यात आले. तसेच, जीर्ण झालेल्या शाळांची बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages