Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या वतीने पोर्टलची निर्मिती.

                                           

                                           


                                            आपल्या बाप्पांचे फोटो अपलोड करण्याचे व दर्शन करण्याचे

      सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन


            अमरावती. दि. ३०  : महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्योउत्सवांतर्गत घरोघरीच्या बाप्पांचे व सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करणे, प्रसिद्ध मंडळे व मंदिरातील गणपतींचे थेट दर्शन मिळावे याकरीता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने  
https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

            या पोर्टलवर आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पांचे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे छायाचित्र अपलोड करू शकता. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे थेट दर्शन घेण्याची सोय देखील या पोर्टल द्वारे करण्यात आली आहे. या संधीचा लाभ अधिकाधिक गणेशभक्तांनी घ्यावा असे आव्हान सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

*****


Post a Comment

0 Comments