भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 30, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. परंतु ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.

सन २०२५-२६ साठी स्वाधार योजनेचा लाभ घेणेसाठी अनूसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश मिळण्यासाठी रितसर अर्ज केलेला आहे. परंतु वसतिगृहातील मर्यादित प्रवेश क्षमतेअभावी ज्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा स्थानिक रहिवासी नसलेल्या व शासन निर्णयातील इतर सर्व अटी व शर्तीची पुर्तता  करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. करिता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता अकरावी व बारावी  तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यवसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रितसर अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड, सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती  तसेच speldswo_amtrediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages