रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 10, 2025

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन


अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्ह्यात काही कृषि निविष्ठा विक्री केंद्र युरिया खताची साठेबाजी आणि जादा दराने खत विक्री करणे, तसेच इतर निविष्ठांची लिंकिंग करीत आहे. अशा कृषी केंद्राची तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कृषी केंद्राविरूद्ध कृषि विभागास प्राप्त तक्रारीबाबत खत निरीक्षकांमार्फत चौकशी करून कृषि निविष्ठा विक्रेत्‍यांनी खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्ग विविध तरतुदींचे उल्लंघन केले आहे, अशा कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे २  परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच ६ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, रासायनिक खते योग्य दराने उपलब्ध होण्यासाठी तसेच कृषि निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी कृषी निविष्ठा रासायनिक खते एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणे, रासायनिक खतासोबत इतर निविष्ठांचे लिंकिंग करणे, रासायनिक खते उपलब्ध असून उपलब्ध करून न देणे, शेतकऱ्यांना बोगस खत विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करणेसाठी जिल्हास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

तालुकास्तरावर १४  कृषी अधिकारी गुण नियंत्रण यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना तक्रार करता यावी यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आले आहे. सदर गुगल फॉर्मचे क्युआर सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्रावर लावण्यात आले आहेत. सदर क्युआर स्कॅन करून शेतकरी तक्रार नोंदवू शकतात. तसेच व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवयाची असल्यास 8080536602 या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages