कृषी केंद्रांनी १० ऑगस्टपूर्वी ई-पॉस बसवावे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 10, 2025

कृषी केंद्रांनी १० ऑगस्टपूर्वी ई-पॉस बसवावे


*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषि विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई-पॉसच्या २९  हजार यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही एक हजार विक्रेत्यांनी ही यंत्रे घेतलेली नाहीत. त्यांनी १० ऑगस्टपूर्वी ई-पॉस मशिन बसवावे, अन्यथा दंडात्मक, परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस यंत्राच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने समाविष्ट करण्यासाठी ई-पॉसमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा समान असणे गरजेचे आहे. यासाठी विक्रीची नोंद आयएफएमएस प्रणालीमध्ये घेणे बंधनकारक आहे. नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रियस्तरावरील तालुका खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. खत विक्रेत्यांकडे ई-पॉसवरील खतसाठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक असल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये ई-पॉस मधील रासायनिक खतामध्ये तफावत आढळुन आलेल्या ६ कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर निलंबन आणि २  कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर रद्दची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये विक्रेत्यांनी एल १  सिक्युरिटी हे नवीन यंत्र अद्यापही घेतलेले नाहीत, अशांनी जिल्ह्यातील कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क करून १० ऑगस्टपूर्वी यंत्र सुरू करावेत, असे आवाहन कृषि उपसंचालक यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages