उच्च शिक्षणातील अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 28, 2025

उच्च शिक्षणातील अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

  

अमरावती, दि. २९  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : देशातील नामांकीत शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून सन २०२४-२५ वर्षासाठी अर्ज करण्यास १  ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक १७ जुलैपासून सुरू झाली आहे. आता दि. १  ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल. किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे.

याबाबत maharashtra.gov.in संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह आयुक्त, समाज कल्याण, ३ , चर्च रोड, पुणे -411 001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages