पोस्ट ऑफिसमध्ये आयटी अल्पिकेशनची सुरूवात *४ ऑगस्टला व्यवहार बंद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 28, 2025

पोस्ट ऑफिसमध्ये आयटी अल्पिकेशनची सुरूवात *४ ऑगस्टला व्यवहार बंद


अमरावती, दि. २९ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): भारतीय डाक विभागाने सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी ‘आयटी २ .0’ महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘एपीटी ॲप्लिकेशन’ डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.

या नव्या प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमधून सुरू होणार आहे. दि.५  ऑगस्ट २०२५  पासून अमरावती प्रधान डाकघराच्या अखत्यारितील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर आणि धारणी तालुक्यातील सर्व टपाल शाखा डाकघर कार्यालये आणि उपडाकघर कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल.

या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतरणाची प्रक्रिया दि. ४ ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आली आहे. या तांत्रिक कामामुळे सोमवार, ४  ऑगस्ट २०२५  रोजी सर्व तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती प्रवर अधिक्षक डाकघर यांनी दिली.

नागरिकांना अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटली सक्षम सेवा देण्यासाठीच ही पावले उचलली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची पोस्टातील कामे दि. ४  जुलै २०२५  पूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages