प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा येत्या सोमवारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 10, 2025

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा येत्या सोमवारी

 

अमरावती, दि. ११  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : 'प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्या'चे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोर्शी रोड, अमरावती येथील एनएसएस हॉलमध्ये सोमवार, १४  जुलै २०२५ रोजी सकाळी १०  वाजता करण्यात आले आहे.

या मेळाव्यात नामांकित कंपन्या थेट तरुणांना शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करणार आहेत. या भरती मेळाव्यात पनवेल येथील प्रसिद्ध एल अँड टी सीएसटीआय तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठित स्थानिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विविध ट्रेडमधील उमेदवारांसाठी, तसेच १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी ही एक संधी आहे. या मेळाव्यात फिटर, वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, सुइंग टेक्नॉलॉजी, ड्रेस मे़किंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक या व्यवसायातील उमेदवारांनी सहभागी व्हावे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावतीचे उपसंचालक आणि सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी अधिकाधिक उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मेळाव्याला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या माध्यमातून अनेक तरुणांना चांगल्या कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages