मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 24, 2025

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया

          अमरावती, दि. २५  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वडगांव तालुका, अचलपूर येथील वीरेंद्र प्रफुल्ल कंटाळे, (वय -अडीच वर्षे ) या बालकाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेला लागणारा संपूर्ण निधी हा जिल्हास्तरावरील कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी बालकाचे वडील प्रफुल्ल कंटाळे यांनी शासनाचे आभार मानले.

  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 या वयोगटातील मुलांची आरोग्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये शस्त्रक्रियेसाठी संदर्भित बालके निघतात, त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये वीरेंद्रच्या   पायाचा त्रास लक्षात आला. या त्रासामुळे त्याला मांडी घालून बसता येत नव्हते. यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा सुमारे एक लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. वीरेंद्रला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

            अमरावती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे  डॉ. श्याम गावंडे  तसेच डॉ सुषमा सावलकर , राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक, अचलपूर व कर्मचारी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे तातडीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.  


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages