राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी "मेडिकल कॅशलेस" योजना लागू करण्याची मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 24, 2025

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी "मेडिकल कॅशलेस" योजना लागू करण्याची मागणी

 अमरावती – महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मेडिकल कॅशलेस योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यातील अनेक विभागांतील शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस सुविधा देणारी योजना लागू आहे. मात्र, शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गैरसोयीमुळे भ्रष्टाचारास देखील प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, यासाठी ही योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी चंद्रशेखर भोयर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages