मेघा नदीच्या पुरामुळे देऊरवाडा काजळेश्वर मठ देवस्थानात अडकलेले बीड जिल्ह्यातील भाविक पूर कमी झाल्यानंतर सकाळी गावी परतले. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, July 27, 2025

मेघा नदीच्या पुरामुळे देऊरवाडा काजळेश्वर मठ देवस्थानात अडकलेले बीड जिल्ह्यातील भाविक पूर कमी झाल्यानंतर सकाळी गावी परतले.

चांदूरबाजार तहसील प्रशासनाच्या वतीने काजळेश्वर मंदिराचे करंजीकर महाराज यांना पत्र देताना प्रभारी तहसीलदार तिवारी.


          शिरजगाव कसबा  दिनांक २८ (विद्या दाभाडे, ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

        शिरजगाव मेघा नदीला आलेल्या पुरामुळे देऊरवाडा काजळेश्वर देवस्थानामध्ये  अडकलेले बीड जिल्ह्यातील भाविक रात्रभर देवस्थानामध्येच रात्री मुक्काम करून पुराचे पाणी कमी झाल्यानंतर काल दि. २७ जुलै ला  सकाळी गावी परतले आहे.

   लोकमतला बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर चांदूरबाजारचे प्रभारी तहसीलदार तिवारी ,मंडळ अधिकारी पठाण व तलाठी मनवर यांनी रविवारी दुपारी देऊरवाडा संगम ठिकाणी मेघा नदीच्या बाजूला असलेल्या काजळेश्वर देवस्थानला भेट दिली असता त्या ठिकाणी करंजेकर महाराज यांची भेट घेऊन तहसील प्रशासनाच्या वतीने त्यांना पत्र देण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने मेघा नदीला कधीही पूर येऊ शकतो यामुळे देवस्थानामध्ये भाविकांना दर्शणार्थ थांबू देऊ नये. जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असे त्या पत्रात नमूद केलेले आहे. 

  महानुभाव पंथाचे  भावीक या मठामध्ये जिल्ह्यातील व इतर राज्यातील  दर्शना साठी येतात काही थोड्या भाविकांना तात्पुरती येथे राहण्याची व्यवस्था आहे. असे करंजकर महाराजांनी प्रशासनाला सांगितले आहे.

परंतु या ठिकाणी नदीला पूल नसल्यामुळे इतर राज्यातील भाविकांना दर्शणार्थ येता येत नाही ही खंत करंजकर महाराजांनी बोलून दाखविली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages