शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर,*देऊरवाडा महानुभाव पंथ मंदिरामध्ये २४ भावीक अडकले.* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, July 26, 2025

शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर,*देऊरवाडा महानुभाव पंथ मंदिरामध्ये २४ भावीक अडकले.*

    
     शिरसगाव कसबा,  दि. २६ जुलै डीगांबर सुने ,(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 
              नदीपात्रातील सर्व  विदर्भ बंधारे पाण्याखाली प्रशासनाकडून  सकल भागातील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा ****
                   चांदूरबाजार तालुक्यातील मध्य प्रदेशातून येणारी शिरजगाव कसबा  मेघा नदीला आज  अचानक पुर आल्याने देऊरवाडा येथील महानुभाव पंथीय मंदिरातील २४ भावीक अडकले आहे. याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. या वर्षातील मान्सून ऋतू मधील हा पहिलाच मोठा पूर आहे. काल रात्रीपासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असून मागील २४ तासांपासून मध्यप्रदेश मधील बैतुल जिल्ह्यात काही भागात सातपुडा पर्वतीय भागात  मुसळधार पावसाची संतप धार चालू असल्याने मध्यप्रदेश मधून उगम असणाऱ्या मेघा नदीतील पाणीपात्र  पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे .
                 या मेघा नदीपात्रातील  शिरजगाव गावाजवळील  २ विदर्भ बंधारे पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली असल्याचे पूर परिस्थिती पाहायला मिळाले आहे . तसेच चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा धरणाच्या पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने  पावसाची अशीच बॅटिंग सुरू असल्यास  पूर्णा प्रकल्प धरणाचे गेट उघडण्यात येऊ शकतात अशी माहिती पूर्णा प्रकल्प  पाटबंधारे विभाग अभियंता अनुप खवणे यांनी माध्यमांना दिली आहे. पूर्णा व मेघानदीकाठी  सकल भागातील नागरिकांनी पावसाची संततधार अशीच राहिल्यास  सतर्क सावध राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.देऊरवाडा येथील  महानुभाव पंथी काजळेश्वर मंदिरामध्ये २४ भाविक अडकलेले आहे. काजळेश्वर मंदिर पुरातन असुन श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी वास्तव केल्याचे पुरातन ग्रंथांमध्ये नोंद आहे., पांडवही या ठिकाणी आल्याची पुरातन ग्रंथात नोंद आहे. या ठिकाणी पंजाब ,हरियाणा तसेच इतर राज्यातून महानुभाव पंथीय भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी ३० वर्षापासून पुलाची मागणी प्रलंबित आहे.आज मेघा नदीला आलेल्या पुरामध्ये २४ भाविक अडकलेले आहे . वृत्त लिहे पर्यंत प्रशासनाने भाविकांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही कारवाई अजून केलेली नाही. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages