निव्वळ मनोरंजनाच माध्यम नव्हे ..एक मोठा उद्योग-व्यवसाय आहे सिनेमा-पंकज धंदर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 4, 2025

निव्वळ मनोरंजनाच माध्यम नव्हे ..एक मोठा उद्योग-व्यवसाय आहे सिनेमा-पंकज धंदर

                             


                               अमरावतीमध्ये "सिनेमा सिनेमा खेळतांना" कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

अमरावती : दि. ५ जुलै

सिनेमा किंवा मीडिया क्षेत्र हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून रोजगाराचे आणि भविष्यातील करिअरची मजबूत दिशा आहे, असे मत अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रोडक्शनचे अध्यक्ष आणि कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक फिल्म मेकर  पंकज धंदर यांनी व्यक्त केले. स्थानिक अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था संचालित बीइंग आर्टिस्ट अकेडमी ऑफ फ़िल्म अँड थियेटर आर्ट्स, द्वारे आयोजित "सिनेमा सिनेमा खेळताना " या चित्रपट उद्योजकता व रोजगार संधी जागरूकता  कार्यशाळा नुकतीच अमरावती येथे संपन्न झाली .

कार्यशाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे बीइंग आर्टिस्ट अकॅडेमि ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् चे माजी विद्यार्थी आणि  मालिका दिग्दर्शक आणि अभिनेता योगेश डवरे ( प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची, अबीर गुलाल ई.) आणि  तुला शिकवीन चांगलाच धडा, सुंदरा मनामधे भरली मालिकांचे  दिग्दर्शक आणि अभिनेता तेजल डहाणकर, तसेच रॅपर  विपिन तातड यांनी आपले अनुभव व्यक्त करून माध्यम क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोस्त्साहित केले.  

कार्यशाळेत चित्रपट, वेब सिरीज, टी वी मालिका व इतर माध्यमांची ओळख, कार्यप्रणाली, वेगवेगळे विभाग, त्यातील विविध व्यवसाय व रोजगार संधीची उपलब्धता, माध्यमांचे रीतसर शिक्षणाचे महत्व व आवश्यकता, आर्थिक सहाय्य , विविध खाजगी तसेच शासकिय विभागांमध्ये नोकरी ची पदे व त्यांची प्रक्रिया या बद्दल मुद्देसूद रीतसर मार्गदर्शन करण्यात आले असून  बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर  आर्ट्सच्या विद्यार्थ्याँद्वारे तयार करण्यात आलेल्या शोर्ट फिल्म्स चे प्रदर्शन करून प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून चर्चा  करण्यात आले. ओळख परिचय-चर्चा-मार्गदर्शन-फ़िल्म स्क्रिनिँग-अनुभवांची देवाण घेवाण अश्या स्वरूपातील या कार्यशाळांची गरज तसेच चित्रपट निर्मिती चे रीतसर प्रशिक्षण घेणे  महत्वाचे आहे याची जाणीव झाल्याचे शेवटी प्रशिक्षणार्थीनी आपल्या प्रतिक्रियांमधुन व्यक्त केले .

या कार्यशाळेच्या आयोजनाची महत्वपूर्ण जबाबदारी बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फ़िल्म अँड थिएटर आर्ट्सचे माजी विद्यार्थी अक्षय बकसरे, संदेश बायस्कर,विज्ञप्ति पर्वतकर, प्रविण वानखडे, राज इसळ,श्रुती दंदे यानी आपली जबाबदारी पार पाडली कार्यशाळेत सचिन गिरी, वैभव गूल्हाने, हृषीकेश लव्हारे, महेश नागले, समीक्षा आष्टीकर, वेदांत पेनोरे, विष्णु आवन्डे, प्रतिका तेलगोटे, अवंतिका ढवळे, हृषीकेश ठाकरे, राज पवार , योगेश लोंदे, यश कावरे, साक्षी जीभकाटे, ई. प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्त सहभाग  नोंदविला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages