जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित वस्तूंचा लिलाव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 14, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित वस्तूंचा लिलाव


अमरावती, दि. १५  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित करण्यात आलेले फर्निचर, लाकडी लोखंडी खुर्चींचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. १८  जुलै पर्यंत निविदा सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या निर्लेखित शासकीय कालबाह्य झालेल्या विविध प्रकारच्या २३७  खुर्च्या जाहिर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. सदर साहित्य आहे त्या स्थितीमध्ये विक्री करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या amravati.nic.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरपत्रक सादर करण्याचा कालावधी पासून पर्यंत दि. ९  जुलै २०२५  सकाळी १०  वाजेपासून ते दि. १७  जुलै २०२५  दुपारी ५  वाजेपर्यंत आहे. यासाठी सपंर्क अधिकारी अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती संपर्क क्रमांक 0721-2662493 आहे. दरपत्रक उघडण्याचा दि. १८ जुलै २०२५ सकाळी ११ वाजता राहील. दरपत्रक अधिक्षक यांचे कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे उघडण्यात येईल. साहित्य खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी साहित्य पाहून निविदेत सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages