अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. २ जानेवारी २०१८ पुर्वी ह्यात नसल्यास त्याच्या पश्चात ह्यात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तींनी मानधन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि.२ जानेवारी २०१८ पुर्वी ह्यात नसल्यास त्याच्या पश्चात ह्यात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तीच अर्ज सादर करू शकतील. दोघेही ह्यात नसल्यास त्यांचे कायदेशीर वारसदार सदर योजनेंतर्गत मानधन किंवा थकबाकी मिळण्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. अर्जदारांनी अर्जामधील क्र. १२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मीसा, डीआयआर आणीबाणीखाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या आणीबाणी धारकाबाबतचे संबंधित पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधिक्षक, कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत. अर्ज दाखल करण्याचा अंतिम मुदत दि.२५ सप्टेंबर २०२५ आहे. यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. २ जानेवारी २०१८ पुर्वी ह्यात नसल्यास त्याच्या पश्चात ह्यात जोडीदार पती, पत्नी अशा अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.