खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव लिहा; दिगंबर जैन समाजाची खासदार बोंडेंमार्फत क्रीडामंत्र्यांकडे मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 2, 2026

खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव लिहा; दिगंबर जैन समाजाची खासदार बोंडेंमार्फत क्रीडामंत्र्यांकडे मागणी

 




  • मुनिश्री निराकार सागरजी, मुनिश्री निर्माणसागरजी, मुनिश्री उत्साहसागरजी महाराज यांचे सानिध्य
दि. ३ अमरावती:
आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे परम प्रभावक शिष्य मुनी श्री निराकारसागरजी, मुनिश्री निर्माणसागरजी आणि मुनिश्री उत्साहसागरजी यांच्या सानिध्यात रतनभवन येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन परवार मंदिरात मुनिसंघाचा चातुर्मास सुरू आहे. या तिन्ही मुनिराजांच्या सानिध्यात आणि आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या प्रेरणेने आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी देशाचे मूळ आणि घटनात्मक नाव 'भारत' अंकित करण्यात यावे, अशी मागणी समस्त दिगंबर जैन समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्षांच्या नावे असलेले निवेदन त्यांना सुपूर्द केले.
'इंडिया नाही, भारत बोला' संदेशातून प्रेरणा
राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांनी दिलेल्या 'इंडिया नाही, भारत बोला' आणि 'लौट चलो भारत की ओर' या संदेशाचा हवाला देत जैन समाजाने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर होणाऱ्या ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स तसेच क्रिकेट आणि हॉकीसारख्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जेव्हा खेळाडूंच्या जर्सी आणि स्कोअरबोर्डवर 'इंडिया'ऐवजी 'भारत' नाव दिसेल, तो सर्व भारतीयांसाठी खऱ्या स्वाभिमानाचा क्षण असेल. भारतीय संविधानाच्या कलम १ मध्येही 'इंडिया अर्थात भारत' असा स्पष्ट उल्लेख असल्याने देशाची खरी ओळख 'भारत' याच नावाने जगात प्रस्थापित झाली पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यापूर्वी आचार्य श्रींच्या नावावर टपाल तिकीट, विशेष लिफाफा आणि स्मारक चिन्ह जारी करून त्यांचा गौरव केला आहे, याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
संसदेत मुद्दा मांडण्याचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे आश्वासन
जैन समाजाने दिलेल्या या निवेदनाची गंभीर दखल घेत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हा विषय आगामी काळात संसद आणि केंद्र सरकारसमोर पूर्ण ताकदीने मांडण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

या प्रसंगी अमरावती जैन समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ. उल्हास क्षीरसागर, ॲड. नकुल चंद्रकांत फुलाडी, मुकेश जैन, शैलेंद्र उर्फ सोनू जैन, सचिन संगई, योगेश विटालकर, प्रदीप आग्रेकर, रुपेश राऊल यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages