दिनांक: 3 ऑक्टोबर 2026
अमरावती, दि. ३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात काल दि. 2 ऑक्टोंबरला विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार अनिता झाडे, तहसिलदार संतोष आठरे, नायब तहसीलदार श्यामसुदंर देशमुख, यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.